State Curriculum Framework (SCF-SE) 2024- your opinion

Gg

 

News

The New Education Policy (NEP) approved by the Union Cabinet of India seeks to transform the education system by streamlining school curriculums and discontinuing MPhil programs. This policy focuses on nurturing both theoretical knowledge and creative abilities in students, promoting holistic development with a greater emphasis on practical learning and skill development.

The New Education Policy (NEP) represents a major transformation in India's educational landscape, and Maharashtra is actively incorporating these changes by developing its own State Curriculum Framework. This framework is designed to address Maharashtra's specific geographical, cultural, and societal needs while staying aligned with the broader vision of the NEP.

State council has demanded the public comments / suggestions till-June 3, 2024. Please fill out the form and provide your valuable suggestions to develop a better syllabus.

नविन धोरणानुसार विद्यार्थ्यांना दोन भाषा निवडायच्या आहेत. त्यात एक भारतीय भाषा तर दुसरी परकीय भाषा किंवा इंग्रजी असेच ऑप्शन असायला हवे. इंग्रजी ला पर्याय म्हणून भारतीय भाषा असू नये. इंग्रजीला पर्याय म्हणून विद्यार्थ्यांना हिंदी , मराठी , संस्कृत , उर्दू , अरेबिक, पाली हे गुण मिळवून देणारे विषय मिळत असतील तर विद्यार्थी इंग्रजी विषय निवडणारच नाही . काही careerist विद्यार्थी सोडले तर ( त्यांनाही जर्मन , फ्रेंच , जपानी भाषेचे आकर्षण राहील) तर जवळपास सर्वच ग्रामीण भागातील विद्यार्थी हे इतर पर्याय निवडतील. त्यामुळे एकतर इंग्रजी विषय सक्तीचा असावा किंवा त्याला अन्य आठ परकीय भाषा च पर्याय असले पाहीजे. या बाबतीत शिकवणी शिक्षकासोबत, ईतरही इंग्रजी शिक्षकांनी जागरूक होणे आत्यंतिक गरजेचे आहे . जर हे धोरण लागू झाले तर हजारो शिकवणी शिक्षक तर बेरोजगार होतीलच सोबतच सर्व उच्च माध्यमिक / कनिष्ठ महाविद्यालयीन इंग्रजी शिक्षक हे अतिरिक्त होतील. म्हणून या साठी सर्वांनी सर्व माध्यमातून पाठपुरावा करायला हवा. सर्वांना विनंती आहे की गुगल फॉर्म भरून आपल्या मौल्यवान सूचना द्याव्यात. 

अभिप्राय नोंदविण्याचा कालावधी दिनांक- 23/05/2024 ते 03/06/2024

Comment

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (एनईपी) अंमलबजावणीच्या अनुषंगाने इयत्ता तिसरी ते बारावीचा अभ्यासक्रम आराखडा जाहीर करण्यात आला आहे. तसेच या मसुद्यावर विद्यार्थ्यांच्या सर्वसामान्य जनतेच्या प्रतिक्रिया ३ जूनपर्यंत मागविण्यात आल्या आहेत.

शालेय पाठ्यक्रम तयार करण्यासाठी राज्य अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण २०२४ मसुदा) राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या (एससीईआरटी)मार्फत तयार करण्यात आला आहे. परीक्षा परिषदेच्या https://www.maa.ac.in/ संकेतस्थळावर हा मसुदा येत्या २३ मे पासून उपलब्ध करून दिला जाणार आहे. एससीईआरटीच्या संकेतस्थळावर राज्य अभ्यासक्रम आराखड्याचा मसुदा सर्व समाज घटकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शिक्षक, पालक, शिक्षण तज्ज्ञ, शैक्षणिक प्रशासन क्षेत्रात काम करणारे तज्ज्ञ यांनी आपले अभिप्राय तीन जूनपर्यंत नोंदवावेत किंवा पोस्टाने पाठवावेत असे आवाहन करण्यात आले आहे. अभिप्राय नोंदवत असताना त्यामध्ये नाव, मोबाईल क्रमांक, ई-मेल, पत्ता, कार्यालय, जिल्हा इत्यादी तपशील देण्यात यावा. तसेच अभिप्राय व सूचना स-प्रमाण व सकारण नोंदविल्या जाव्यात. त्यामध्ये क्षेत्र विषय स्तर, पृष्ठ क्रमांक, मूळ मसुद्यातील तपशील, आवश्यक बदलण्याचे कारण, कोणत्या मसुद्यामध्ये दुरुस्ती आवश्यक वाटते याचा तपशील, सुधारित मजकूर कसा असावा, याचा समावेश असणे अपेक्षित आहे.

पोस्टाने अभिप्राय पाठवणार असल्यास त्यावर ‘SCF-SE राज्य अभ्यासक्रम आराखडा याबाबत अभिप्राय, असे ठळक अक्षरात लिहून महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद, कुमठेकर रस्ता, सदाशिव पेठ पुणे, ३० या पत्त्यावर पाठवावे.

Comn
Lok (2)
Slo
Ht
Lo
Lk
We Proved It (1)

To share this information with your friends and others click the following button

List of 1000 Verbs forms - Click here

HSC Board and Test series Papers for download