#shivaji-maharaj-rajyabhishek-sohala

shivaji-maharaj-rajyabhishek-sohala
shivaji-maharaj-rajyabhishek-sohala

शिवराज्याभिषेक सोहळा | किल्ले रायगड ६ जून १६७४ रोजी किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा  राज्याभिषेक झाला आणि प्रस्तापितांची गुलामी नष्ट करून शेकडो वर्षानंतर प्रथमच रयतेचे स्वंतत्र   सार्वभौम स्वराज्य निर्माण करून छत्रपती शिवाजी महाराज सर्वसामान्यांचे छत्रपती झाले आणि रयतेला राजा मिळाला.  महाराष्ट्राचंच नव्हे तर अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक, रयतेचे राजे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकानं, साडेतीनशे वर्षांपूर्वी देशात लोककल्याणकारी राज्याची, लोकशाही व्यवस्थेची पायाभरणी केली. अठरा पगड जातींना, बारा बलुतेदारांना, सर्व जाती, धर्म, भाषा, प्रांताच्या मावळ्यांना सोबत घेऊन महाराजांनी शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, रयतेचं राज्य स्थापन केलं. आदर्श राज्यकारभारासाठी अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली. गडकिल्ले भक्कम केले. घोडदळ, पायदळ, आरमारानं सुसज्ज शिस्तबद्ध सैन्यव्यवस्था निर्माण केली. अभेद्य गुप्तचर यंत्रणा उभारली. शेतीला, उद्योग, व्यापाराला प्रोत्साहन दिलं. पडीक जमीन लागवडीखाली आणली. शेतसारा, करांमध्ये सवलतीचं धोरण राबवलं. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात न लावण्याची ताकीद दिली. जे हवं ते शेतकऱ्यांकडून विकत घेण्याचे आदेश काढले. महिलांना सन्मान दिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला अभिमान, स्वाभिमान दिला. कुठल्याही आव्हानाला भिडण्याचं बळ, विश्वास दिला. शिवराज्याभिषेकानं अखंड हिंदुस्थानला पहिले छत्रपती मिळाले. स्वकर्तृत्वाच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराज जगातील सार्वकालीन सर्वश्रेष्ठ राजे ठरले. महाराजांनी घालून दिलेल्या आदर्शांवरच प्रगत, महाराष्ट्राची,हिंदुस्थानची आजवरची वाटचाल सुरु आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही महाराष्ट्राच्या, देशाच्या इतिहासातील सर्वात आनंदाची, अभिमानाची घटना आहे.   रायगडावर या सोहळ्यासाठी विविध राज्यांचे राजदूत, प्रतिनिधी, परदेशी उद्योगपतींनाही आमंत्रित करण्यात आले होते यात अनेक देशी विदेशी साडेचार हजार राजे, सरदार यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. रायगडावर या सोहळ्यात हेन्री ऑक्सएन्डन हा इंग्रज अधिकारी उपस्थित होता. या हेन्री ऑक्सपएन्डन ने राज्याभिषेक सोहळा सुरु झाल्यापासून ते संपेपर्यंत संपूर्ण सोहळ्याची वरणनात्मक माहिती आपल्या डायरीत नमूद केली होती आणि हीच माहिती शिवरायांच्या राज्याभिषेकाबद्दल एक ठोस पुरावा तसेच अतिशय विस्तृत व सखोल आणि उत्तम माहिती म्हणून इतिहासात महत्वपूर्ण मानली गेली आहे. हेत्री ने असे नमूद केले आहे कि, राज्याभिषेक सोहळा हा दिनांक ३० मे १६७४ रोजी सुरु केला गेला आणि दिनांक ६ जून १६७४ रोजी संपन्न झाला. या ८ दिवसांत अनेक वेगवेगळे विधी व संस्कार शिवरायांवर व त्यांच्या परिवारावर करण्यात आले. भारतीय इतिहासात या घटनेकडे खूप महत्वाची घटना म्हणून पाहिले जाते. कारण त्या काळात संपूर्ण भारत परकिय आक्रमणांनी ग्रासला होता आणि एवढ्या मोठ्या शत्रूंना तोंड देऊन छत्रपतींनी आपला राज्याभिषेक केला होता. ही भारतीय इतिहासातील सामान्य गोष्ट नव्हती. राज्याभिषेक करून राजा ही पदवी धारण करुन भारतातील परकीयांना शह देणे ही त्या काळात खुप धाडसाची कामगिरी छत्रपतींनी केली म्हणून भारतीय इतिहासात या घटनेकडे एक युगप्रवर्तक घटना म्हणून बघितले जाते. राज्याभिषेक झाल्यानंतर छत्रपतींनी अनेक सुधारणा घडवून आणल्या. परकीय शत्रूंना शह देणारा छत्रपती म्हणून शिवाजी महाराजांकडे बघितले जाऊ लागले. शिवराज्याभिषेकानंतर महाराजांनी शिवराई व होन या दोन चलनाची निर्मिती केली. शिवराई ही चांदीची नाणी व होन ही सोन्याची नाणी चलनात आणली. राजांनी राज्यकारभाराच्या सोयीसाठी ही चलन निर्मिती केली. त्या दिवसापासून रायरीचे नाव रायगड असे बदलले. शिवरायांनी राज्याभिषेक झाल्यानंतर राज्यकारभारासाठी मराठी भाषेचा वापर केला. मराठी भाषेस महत्त्व दिले. परकीय भाषा वापरण्यापेक्षा आपली मातृभाषा महाराजांनी राज्यकारभारात वापरली. यातून महाराजांचे भाषा प्रेम दिसून येते. राज्याभिषेकावेळी शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळातील मंत्र्यांची पदे वंशपरांगत न ठेवता मंत्र्यांच्या कर्तबगारीवर ठरण्यात येत असत. अष्टप्रधान मंडळ पुढील प्रमाणे होते. १) पंतप्रधान (पेशवा) - सर्वोच्च मंत्रीपद मोरोपंत त्रिंबक पिंगळे २) पंत अमात्य - रामचंद्र नीळकंठ ३) पंत सचिव सुरणीस - अनाजीपंत दत्तो ४) मंत्री वाकनीस - दत्ताजी पंत त्रिंबक ५) सेनापती सरनौबत - हंबीरराव मोहिते ६) पंत सुमंत (डाबिर) - रामचंद्र त्रिंबक ७) न्यायाधीश - निराजपंत रावजी शिवराज्याभिषेकाच्या निमित्तानं मी छत्रपती शिवाजी महाराज  व स्वराज्य स्थापनेत महाराजांना साथ देणाऱ्या तमाम मावळ्यांना वंदन करतो. योगीराज वामनराव अरसोड, अरसोड इंग्लिश क्लासेस , यवतमाळ   १] WhatsApp Update : आता WhatsApp Message मध्ये  चूक झाल्यास, ती चुक edit करू शकता. अधिक माहीती करीता दिलेल्या लिक वर क्लिक करा https://arsodenglishclasses.com/whatsapp-updates/ अरसोड इंग्लिश क्लासेस , यवतमाळ, आयोजित उन्हाळी online वक्तृत्व स्पर्धा आपणही आपल्या भाषणाचा video पाठवून स्पर्धेत सहभागी व्हा.   अधिक माहीती करीता खालिल लिंकवर क्लिक करा. https://arsodenglishclasses.com/competiton-2023/ VIDEOS all Watch The Videos सोहम आशिष माने , नागपुर अथर्व सुनील ठाकरे, कारंजा स्मित सचिन भोयर , अकोला , समृद्धी पाटील, कोल्हापूर तन्मय खुशाल चौधरी - Thanks for Visiting Click to contact us 9822716201 arsodyogiraj@gmail.com 4, Dewkinandan, Shinde Plots, Yavatmal. Whatsapp Us Follow Us

Read more