Shivjayanti Home Decoration competition
भव्य शिवजयंती सजावट स्पर्धा
सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती आयोजित
छत्रपती महोत्सवा अंतर्गत
"भव्य घरगुती शिवजयंती सजावट स्पर्धा"
*स्पर्धा नव्हे , कर्तव्य म्हणून शिवजयंतीच्या दिवशी सजावट करा आणि फोटो पाठवा*
सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने यवतमाळमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात शिवजयंती साजरी करण्यात येते यामध्ये वैचारिक , सांस्कृतिक प्रबोधनात्मक कार्यक्रमा सोबतच वेगवेगळ्या स्पर्धा सुद्धा आयोजित केल्या जातात, दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा यवतमाळमध्ये शिवजयंती घराघरात पोहोचविण्यासाठी “घरगुती शिवजयंती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा खुली असून या स्पर्धेत पालक किवा विद्यार्थी कुणालाही सहभागी होता येणार आहे. स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धकांना त्यांच्या घरी, शाळा, कॉलेज, शिकवणी वर्ग किंवा व्यवसायिक प्रतिष्ठाणात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती किंवा प्रतिमेची उत्कृष्ट व आकर्षक सजावट करुण किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील देखावा उभा करुण. स्पर्धकांनी या सजावटीचे आपल्या कुटूंबा समवेत घेतलेले फोटो, आपले संपूर्ण नाव व पत्यासाहित, सोमवार, दिनांक 19 फेब्रुवारी २०२४ ला दुपारी बारा पुर्वी खालिल कोणत्याही Whatsaap no. वर पाठवावे. आकर्षक तथा अभिनव सजावटीसाठी निवड करण्यात आलेल्या पहिल्या दहा मावळ्यांच्या घरी परीक्षक मंडळी प्रत्यक्ष भेट देऊन परीक्षण करेल परंतु परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. या स्पर्धेत उत्कृष्ट ठरलेल्या सजावटीसाठी *प्रथम बक्षीस: २००० ₹ रोख; द्वितीय बक्षीस:१५०० ₹ रोख; तृतीय बक्षीस: १००० ₹ रोख, स्मृतिचिन्ह आणि गौरवपत्र* देण्यात येईल. तसेच सहभागी सर्व मावळ्यांना सुद्धा गौरवपत्र देण्यात येईल या स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत, 19 फेब्रुवारी २०२४ ला सायंकाळी साडेआठ वाजता *शिवतीर्थावर* (छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा परीसर,गार्डन रोड, बसस्थानक चौक, यवतमाळ) होईल, असे संयोजक प्रा. सुनील कडू यांनी कळविले आहे
संपर्क
योगीराज अरसोड- 9822716201,
शशिकांत खडसे- 7798390870,
विजय निकम - 9420050480,
अविनाश देशमुख -9403457863,
महेंद्र विरूळकर -9881173116,
श्रीदीप इंगोले - 9404262025,
प्रशांत वानखडे - 7350387140,
विनोद दोंदल - 8806600688
विजय ठाकरे - 9420050463
- Categories
- English For All