नियमित चष्मा लावणाऱ्या लाखो-कोटी जनतेसाठी एक चांगली बातमी 

प्रेस्वु आय ड्रॉप्स  काय आहे? हे ड्रॉप कसे कार्य करतात? प्रेस्वु आय ड्रॉप्स इतके प्रभावी का आहेत? 

मुंबईतील एन्टोड फार्मास्यूटिकल्सने (Entod) प्रेस्वू आय ड्रॉप (PresVu Eye Drop Launch)  प्रेसबायोपिया (जवळचे दिसणे कठीण होणे) या समस्यावर उपाय म्हणून प्रेस्वु आय ड्रॉप्स विकसित केले आहेत.

दोन वर्षांहून अधिक काळापर्यंत आयड्रॉपची तपासणी पूर्ण केल्यानंतर भारताच्या औषध नियामक संस्थेने या आयड्रॉपला हिरवा कंदील दिला. 

Entod चे सीईओ निखिल मसुरकर नुसार , या औषधाचा एक थेंब डोळ्यात  टाकल्यानंतर 15 मिनिटांत परिणाम दिसून येईल. 

याचा प्रभाव पुढील सहा तासांपर्यंत राहील. पहिला ड्रॉप टाकल्यानंतरच्या तीन तासात दुसरा ड्रॉप टाकला तर याचा प्रभाव अधिक कालावधीपर्यंत राहील. 

Entod चे सीईओ निखिल मसुरकर म्हणाले, आतापर्यंत डोळ्यांच्या समस्येसाठी चष्मा किंवा कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर केला जात होता. 

काहीवेळा शस्त्रक्रियेच्या पर्यायाचा अवलंब केला जातो. मात्र त्यावर प्रेस्वू ड्रॉप्स फायदेशीर ठरेल. 

या ड्रॉप्सचा एक थेंब टाकल्याने सहा तासांपर्यंत चष्म्याची गरज भासणार नाही. 

प्रेस्वु आय ड्रॉप्स हे चष्म्याच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी एक उत्तम पर्याय असू शकते.

प्रेस्वु आय ड्रॉप्स तयार करतांना  डायनॅमिक बफर तंत्रज्ञान वापरले आहे. यामुळे, प्रेस्वु आय ड्रॉप्सचे  थेंब डोळ्यांना अश्रूंच्या पीएचशी त्वरीत जुळवून घेण्यास मदत करतात.

हे  ड्रॉप्स केवळ चष्मा दूर करण्यासाठीच नाही तर डोळ्यांतील कोरडेपणा दूर करण्यास देखील मदत करतात. 

सर्वसामान्यांना परवडणारी या ड्रॉप्सची किंमत केवळ 350 रुपये असू शकते. 

या ड्रॉप्समध्ये पायलोकार्पिन नावाचा घटक असतो जो डोळ्यांची पेशी सक्रिय करून जवळच्या वस्तू स्पष्टपणे दिसण्यास मदत करतो.

मोबाईल, लॅपटॉपच्या अतिवापरामुळे, डोळ्यांमध्ये थकवा किवा कोरडेपणा तसेच वाढत्या वयासोबत जवळचे दिसत नसेल तर , ड्रॉपचा फायदा होऊ शकतो.

प्रसिद्ध नेत्रतज्ञ तात्यासाहेब लहाने यांनी प्रेस्वु आय ड्रॉप्स उपयोगी ठरेल असे  प्रसार माध्यमासोबत बोलतांना  सांगितले 

October पासुन हा ड्रॅाप सर्व मेडीकल मध्ये उपलब्ध होईल असा अंदाज आहे.

प्रेस्वु आय ड्रॉप्सचा वापर करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. ड्रॉप्स वापरण्याच्या वेळी दिलेल्या सूचनांचे काळजीपूर्वक पालन करा.

Thanks for Reading.  Read More Stories