Categories: English For All

Shivjayanti Home Decoration competition

सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती आयोजित

छत्रपती महोत्सवा अंतर्गत

 “भव्य घरगुती शिवजयंती सजावट स्पर्धा

स्पर्धा नव्हे , कर्तव्य म्हणून शिवजयंतीच्या दिवशी  सजावट करा आणि फोटो पाठवा

सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने  यवतमाळमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात  शिवजयंती साजरी करण्यात येते यामध्ये वैचारिक , सांस्कृतिक प्रबोधनात्मक कार्यक्रमा सोबतच वेगवेगळ्या स्पर्धा  सुद्धा आयोजित केल्या जातात, दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा यवतमाळमध्ये शिवजयंती घराघरात पोहोचविण्यासाठी घरगुती शिवजयंती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा खुली असून या  स्पर्धेत पालक किवा  विद्यार्थी कुणालाही सहभागी होता येणार आहे. स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धकांना त्यांच्या घरी, शाळा, कॉलेज, शिकवणी वर्ग किंवा व्यवसायिक प्रतिष्ठाणात   छत्रपती शिवाजी महाराजांची  मूर्ती किंवा प्रतिमेची उत्कृष्ट व  आकर्षक सजावट करुण  किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या  जीवनावरील देखावा  उभा करुण. स्पर्धकांनी या सजावटीचे आपल्या कुटूंबा समवेत घेतलेले फोटो, आपले संपूर्ण नाव व पत्यासाहित, बुधवार, दिनांक 19 फेब्रुवारी २०२५ला  दुपारी बारा पुर्वी खालिल कोणत्याही  Whatsaap no.  वर पाठवावे. आकर्षक तथा  अभिनव सजावटीसाठी निवड करण्यात आलेल्या पहिल्या दहा मावळ्यांच्या घरी परीक्षक मंडळी प्रत्यक्ष भेट देऊन परीक्षण करेल परंतु परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. या स्पर्धेत उत्कृष्ट ठरलेल्या सजावटीसाठी प्रथम बक्षीस: २००० रोख; द्वितीय बक्षीस:१५०० रोख; तृतीय बक्षीस: १००० रोख, स्मृतिचिन्ह आणि गौरवपत्र  देण्यात येईल. तसेच  सहभागी  सर्व  मावळ्यांना सुद्धा गौरवपत्र  देण्यात येईल या स्पर्धेचा  बक्षिस वितरण समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत, 19 फेब्रुवारी २०२४ ला रात्री साडेआठ वाजता शिवतीर्थावर (छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा परीसर,गार्डन रोड, बसस्थानक चौक, यवतमाळ) होईल.

संपर्क   

योगीराज अरसोड- 9822716201

शशिकांत खडसे- 7798390870, 

विजय निकम – 9420050480,  

अविनाश देशमुख -9403457863, 

महेंद्र विरूळकर -9881173116, 

श्रीदीप इंगोले – 9404262025, 

प्रशांत वानखडे – 7350387140, 

विनोद दोंदल – 8806600688

विजय ठाकरे – 9420050463

इतर स्पर्धा -2025

शिव सामान्य ज्ञान ऑनलाइन स्पर्ध

वर्ग 5 ते 8 व वर्ग 9 ते 12 या दोन गटांमध्ये ही स्पर्धा घेण्यात येत आहे.
लिंक दिनांक 17 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत सुरु राहील. दिलेल्या बटन वर  क्लिक करा व पेपर सोडवा.
प्रथम तीन विजेत्यांना दिनांक 19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 8 वाजता “शिवतीर्थ” शिवरायांचा पुतळा, यवतमाळ येथील कार्यक्रमात बक्षीस व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात येईल.

Arsod Sir

Share
Published by
Arsod Sir

Recent Posts

HSC Result 2026

Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education, Pune will declare the SSC result…

1 day ago

How to Find your booth address?

Find your polling address to avoid the distractions

5 months ago

Test series Timetable 2025- 2026

This is the test series timetable for the students of Arsod English Classes. there will…

6 months ago

SSC and HSC Maharashtra Board complete Timetable – 2026

SSC and HSC Maharashtra Board examination Timetable - for the year 2026

6 months ago

Notes All in One

Visit here to see all the notes of prose, poem, grammar, novels and writing skills

1 year ago

2.6 Money – Learn In a Simple Way

2.6 Money - Learn In a Simple Way - The poem tells us about the…

2 years ago