Announcement /News
‘इन्स्पायर’ शिष्यवृत्तीसाठी 85.83 % आवश्यक.
बारावी (सायन्स) उत्तीर्ण झालेल्या पहिल्या १ टक्का विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी, केंद्र शासनाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्यावतीने ‘इन्स्पायर’ या योजने अंतर्गत देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती करिता कसा अर्ज करावा.
केंद्र शासनाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्यावतीने 85.83 % किंवा अधिक गुणांनी उत्तीर्ण झालेल्या पहिल्या १ टक्का विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती देण्यात येणार असून या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या परीक्षेमध्ये 85.83 % किंवा यापेक्षा आधिक गुण मिळालेले विद्यार्थी पात्र ठरणार आहेत.
केंद्र शासनाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्यावतीने ‘इन्स्पायर’ या योजने अंतर्गत बारावी उत्तीर्ण झालेल्या पहिल्या १ टक्का विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना मूलभूत विज्ञान विषयांमध्ये उच्च शिक्षण घ्यायचे आहे, असे विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरणार आहेत. उच्च माध्यमिक शालान्त परीक्षा घेणाऱ्या देशभरातील विविध शिक्षणमंडळांना या शिष्यवृत्तीसाठी गुणांची किमान मर्यादा ठरवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार राज्यमंडळाने 85.83 % किंवा अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यासाठी पात्र ठरणार आहेत.
1] शिष्यवृत्तीची रक्कम: बारावी नंतरच्या प्रत्येक विद्यार्थ्यांना दरवर्षी 80,000/- {फक्त SBI च्या खात्यात } प्राप्त होईल. 80,000/- पैकी 60,000 दरमहा 5000/- प्रमाणे मिळेल व उर्वरित 20,000 कोणत्याही मान्यताप्राप्त संशोधकाच्या अंतर्गत उन्हाळी संशोधन प्रकल्प पूर्ण केल्यानंतर प्रकल्प अहवाल आणि मेंटॉरचे प्रमाणपत्र नंतर सादर केल्या नंतर मिळेल.
2] SHE साठी कोण अर्ज करू शकतो? : अ] बारावीच्या परीक्षेत 85.83 % किंवा यापेक्षा आधिक गुण मिळालेले विद्यार्थी. ब] (किंवा) जे विद्यार्थी IIT, AIPMT, JEE मध्ये टॉप 10000 रँकमध्ये असेल
3] बारावी नंतर (BSc करिता ) कोणत्या विषया करिता शिष्यवृत्ती मिळते ? :
(1) Physics
(2) Chemistry
(3) Mathematics
(4) Biology
(5) Statistics
(6) Geology
(7) Astrophysics
(8) Astronomy
(9) Electronics
(10) Botany
(11) Zoology
(12) Biochemistry
(13) Anthropology
(14) Microbiology
(15) Geophysics
(16) Geochemistry
(17) Atmospheric Sciences &
(18) Oceanic Sciences.
4] कोणत्या विषया करिता शिष्यवृत्ती मिळत नाही ? : Engineering, Medicine, Military Science, Defence Studies, Agriculture, Psychology, Seed Technology, Home Science, Geography, Economics, Education (including B.Sc.-B.Ed. dual degree course), Biotechnology, Computer Science, Computer Applications, Bioinformatics, Instrumentation, Information Technology, Physical Education, courses in Distance Education mode at the Open Universities and other professional courses.
5] शिष्यवृत्ती (INSPIRE-SHE) चा कार्यकाळ किती असेल ? : चांगल्या शैक्षणिक/ परीक्षांमधील कामगिरीनुसार, विद्यापीठ आणि संस्थेच्या प्रमुखाच्या शिफारसीप्रमाणे, निवडझालेल्या विद्यार्थ्यांना कमाल पाच वर्षांच्या कालावधीसाठी शिष्यवृत्ती दिली जाईल (प्रथम वर्ष B.Sc., B.S., M.Sc./M.S.) किंवा अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत),
6] अर्ज कधी करावा? : बारावीची परीक्षा 85.83 % किंवा अधिक गुणांनी, वर्षात उत्तीर्ण झाल्यावर B.Sc., B.S., मध्ये प्रवेश घेतला त्याच वर्षी अर्ज करू शकतात. अर्जांसाठी https://www.online-inspire.gov.in या वेब पोर्टलवर जाहिरात केली जाईल. विद्यार्थ्यांनी या वेब पोर्टला जाहिराती करिता भेट द्यावी.
7] शिष्यवृत्तीसाठी अर्ज कसा करावा? शिष्यवृत्तीसाठी केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येईल. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, https://www.online-inspire.gov.in या लिंकवर क्लिक करा. ऑनलाइन अर्जांसाठी मार्गदर्शक तत्त्वे बघा.
8]अर्जासोबतची आवश्यक कागदपत्रे कोणती?
1) बारावीच्या गुणपत्रिका (अनिवार्य)
2) दहावीची मार्कशीट/प्रमाणपत्र (जन्म तारखेच्या पुराव्यासाठी)(अनिवार्य)
३) महाविद्यालय प्राचार्य / संस्थेचे संचालक / विद्यापीठाचे कुलसचिव यांच्या स्वाक्षरी ]सह विहित नमुन्यातील पुष्टीकरण (Endorsement Certificate) प्रमाणपत्र (अनिवार्य)
4) पात्रता सूचना / सल्लागार सूचना (Eligibility Note /Advisory Note) (राज्य/केंद्रीय मंडळाने प्रदान केल्यास) (नाही अनिवार्य)
5)JEE (मुख्य)/ JEE (प्रगत)/ NEET/ KVPY मध्ये रँक किंवा पुरस्कार निर्दिष्ट करणारे प्रमाणपत्र /JBNSTS/NTSE/आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक पदक विजेते (जर उमेदवार या अंतर्गत पात्र असेल हा निकष)(अनिवार्य)
कृपया लक्षात घ्या की अपूर्ण अर्ज सरसकट नाकारले जातील.